राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत चैतन्य तांड्यात कार्यशाळा

चाळीसगाव- लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत तालुक्यातील चैतन्य तांड्यात कार्यशाळेचे आयोजन मंगळवार रोजी करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अनिता दिनकर राठोड हे उपस्थित होत्या.

महात्मा गांधी यांनी स्वयंपूर्ण खेडी होण्याची स्वप्ने बघितली होती. याचा प्रत्यय राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानातून येत आहे. सदर अभियानांतर्गत गावांचा विकास कसा साधला जावा यासाठी कार्यशाळेच्या माध्यमातून मान्यवर हे मार्गदर्शन करतात.

दरम्यान ६ सप्टेंबर, मंगळवार रोजी रावेर तालुक्यातील खिरोदा येथील पंचायत राज प्रशिक्षण केंद्रातील प्रमुख मान्यवरांनी चैतन्य तांडा ग्रामपंचायतीला भेट देऊन ग्रामपंचायत विकास आराखडा व शाश्वत विकास ध्येय प्रशिक्षणाबाबत येथील जि.प. शाळेत कार्यशाळा घेतली. यावेळी प्रमुख मान्यवरांनी ग्रामपंचायत विकास आराखडा व शाश्वत विकास ध्येय प्रशिक्षण या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.

याप्रसंगी अजय एच. सोरदे (प्रशिक्षण समन्वय- खिरोदा), अमोल ए. देशमुख (प्रशिक्षण सहाय्यक- खिरोदा), लोकेश डी. अंगारी (प्रशिक्षण सहाय्यक खिरोदा), भास्कर बी. जगताप (प्रविण शिक्षक-यशदा), दिपक मोरे (प्रविण शिक्षक-यशदा), मनोज करोडपती (प्रविण शिक्षक-यशदा), प्रविण ए. राठोड (क्षेत्रिय सहाय्यक- खिरोदा), शशीकांत बी. राठोड (क्षेत्रिय सहाय्यक- खिरोदा) यांच्यासह विकास सोसायटी चेअरमन दिनकर राठोड, सरपंच अनिता राठोड, ग्रामसेवक कैलास जाधव, उपसरपंच आनंदा राठोड, सदस्या अनिता चव्हाण, यशोदा चव्हाण, गीता राठोड, वसंत राठोड व उदल पवार पदम तवर, ममराज राठोड, देवसिंग राठोड, भावलाल चव्हाण, राजेंद्र चव्हाण, संतोष चव्हाण व पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content