राज्यस्तरीय ‘व्हॉलीबॉल’ स्पर्धेत डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाने पटकविले विजेतेपद

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख मेमोरीयल वैद्यकीय महाविद्यालात आयोजित राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट आणि व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये ‘डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालया’च्या टिमने दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांकाचे विजेतेपद पटकविले तर क्रिकेट या स्पर्धेत उपविजेतपद पटकविले आहे.

खेळाडूंच्या या यशाचे महाविद्यालयाच्या वतीने कौतुक करण्यात आले. ‘ओडेसी २०२२’ अंतर्गत अमरावती येथे डॉ. पंजाबराव देशमुख मेमोरीयल वैद्यकीय महाविद्यालयात दि. १० ते १८ मे या कालावधीत आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट आणि व्हॉलीबॉल स्पर्धा पार पडल्या.

या स्पर्धांमध्ये राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालयातील संघ सहभागी झाला होता. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या संघानेही क्रिकेट आणि व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी स्वतंत्र टिम मैदानात उतरविल्या होत्या.

व्हॉलीबॉल स्पर्धेत डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या संघात कर्णधार विनायक पाटील, उपकर्णधार चेतन पाटील, श्रीवेद निकम, कुणाल नाईक, आशुतोष मगर, देवेंद्र भगत, रोहीत भोसले, आशुतोष शेळके यांचा समावेश होता.

व्हॉलीबॉल संघाने चमकदार कामगिरी करीत प्रथम क्रमांकाचे विजेतेपद पटकवुन डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. व्हॉलीबॉल संघाला ट्रॉफी आणि रोख रकमेचे पारितोषिक मिळाले.

क्रिकेट स्पर्धेमध्ये डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील कर्णधार वैभव देशमुख, उपकर्णधार सत्यम काळे, कुणाल नाईक, आशुतोष तिवारी, माधव मुरका, संजोग काळे, बिपीन सातळकर, शुभम जोगदंड, शैलेश शेटे, यश महाजन, चेतन पाटील, रोहीत भोसले, ओम तिडके, ललीत सोनार यांनी सहभाग घेतला. क्रिकेट या स्पर्धेत डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या संघाने उपविजेतेपद पटकविले.

या सर्व खेळाडूंना प्रा. रितेश तायडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच यशस्वी खेळाडूंचे माजी खा. डॉ. उल्हास पाटील, अधिष्ठाता डॉ. एन.एस. आर्वीकर, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, डॉ. वैभव पाटील, डॉ. केतकी पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

Protected Content