घराला लागली आग; साडेपाच लाखांची रोकड खाक

जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील कुंभारीसिम येथील युवराज पुंडलीक पाटील यांच्या घराला सोमवारी मध्यरात्री रात्री आग लागली. या आगीत कापूस विकून आलेल्या साडेपाच लाख रूपयांच्या रोख रकमेसह संसारोपयोगी साहित्याची जळून राख झाली आहे.

घरातील सर्वजण बाहेर झोपलेले असल्याने सुदैवाने जिवीतहाणी टळली आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, “युवराज पाटील हे आपल्या कुटूंबासह कुंभारीसिम येथे रहातात. जावाई संजय पाटील व मुलगी योगिता हे घरी आलेले असल्याने सोमवारी रात्री सर्वांनी सोबत जेवण केले. उन्हामुळे होत असलेला उकाळा पहाता जेवणानंतर पुंडलिक केशव पाटील या वृध्द वडीलांसह युवराज पाटील, पत्नी रत्ना पाटील, मुलगा प्रमोद व तेजस, जावई व मुलगी असे सर्वजण घराबाहेर झोपले.

मध्यरात्री काहीतरी जोरात आवाज होऊन घरातून धूर निघतांना दिसला. एकच मुख्य दरवाजा असल्याने निघणारा प्रचंड धूर पहाता घरात जाणे शक्य नव्हते. एव्हाना आग लागल्याचे लक्षात आल्याने शेजाऱ्यांच्या नागरीकांनी मिळेल तसे पाणी टाकून आग विझविली. त्यानंतर घरात प्रवेश केला असता संपूर्ण संसारोपयोगी साहित्याची राखरांगोळी झाली होती. त्याचबरोबर कापूस विकून आलेले साडेपाच लाख रूपयेही जळाल्याने युवराज पाटील यांचे कुटूंबातील सदस्यांना रडू कोसळले.

Protected Content