चोपडा येथून शेतकऱ्याची दुचाकी लांबविली; शहर पोलीसात गुन्हा दाखल

चोपडा प्रतिनिधी । चोपडा शहरातील उपजिल्हा रुग्णालयातून एका शेतकऱ्याची २० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण भाऊराव बाविस्कर (वय-२०, रा.सत्रासेन ता.चोपडा )हे शेती काम करून आपला उदरनिर्वाह करतात त्यांच्याकडे शेतीच्या कामासाठी (एमएच 19, सीएस २७७०) क्रमांकाची दुचाकी आहे. 31 मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ते चोपडा शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील नातेवाईकांना भेटण्यासाठी दुचाकीने आले. १ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास चोपडा शहरातील उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या पार्किंगच्या ठिकाणी लावलेल्या त्यांची दुचाकी त्यांना दिसून आली नाही. परिसरात शोधाशोध करून दुचाकी मिळून न आल्याने त्यांनी चोपडा शहर पोलीस ठाणे गाठले. प्रवीण बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक प्रमोद पाटील करीत आहे.

Protected Content