गिरीश महाजनांबाबत आक्षेपार्ह पोस्ट : धुळ्यात राडा

धुळे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा धुळ्याचे पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांच्या विरोधात आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट टाकल्यावरून धुळ्यात एकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या कारची तोडफोड करण्यात आली आहे.

धुळे येथील डॉ. संजय पिंगळे यांनी त्यांच्या फेसबुक प्रोफाईलवरून काल दुपारी पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांचा अवमान करणारी पोस्ट टाकल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या संदर्भात भाजप पदाधिकार्‍यांनी तात्काळ पोलीस स्थानकात धाव घेऊन संबंधीतांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

दरम्यान, रात्री उशीरा डॉ. संजय पिंगळे यांच्या कारची तोडफोड करून त्यांना धमकावण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलेच तापले आहे. तर तोडफोड केल्याप्रकरणी देखील डॉ. संजय पिंगळे यांच्या पत्नीने फिर्याद दिली असून या प्रकरणी भाजपच्या सात पदाधिकार्‍यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. संजय पिंगळे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी असल्याची माहिती आहे. यामुळे या वादाला राजकीय वैमनस्याची किनार देखील असल्याचे समजते.

Protected Content

%d bloggers like this: