आर्यन खान प्रकरणी भाजप तोंडघशी – नाना पटोले

मुंबई,लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राज्यात आर्यनखान अमली पदार्थ प्रकरण उभे करून जातीय तेढ निर्माण केली. आणि त्या माध्यमातून उत्तर प्रदेशच्या निवडणुकां जिंकण्यासाठी जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न भाजपाने केला, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

आर्यन खानला अमली पदार्थ प्रकरणांमध्ये आर्यन खानकडे कोणतेही अमलीपदार्थ नव्हते, असे सांगत त्याच्यावर गुन्हे दाखल करणाऱ्या केंद्राच्या तपास यंत्रणेने आर्यन खानची निर्दोष मुक्तता केली. त्यामुळे भाजपाचा तो डाव उघडा पडला आहे. भाजपा या कटकारस्थानामुळे तोंडावर पडली आहे. असा आरोप नाना पटोले यांनी केला. ते पालघर दौऱ्यावर आले असताना जिल्हा कॉंग्रेस भवनात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

युवकांच्या हाताला काम देण्या ऐवजी त्यांना बेरोजगारीच्या खाईत ढकलण्याचे पाप भाजपा करीत आहे. गुजरातच्या अदानी बंदरावर करोडो रुपयांचे अमलीपदार्थ पदार्थ आणले जातात,बऱ्याचवेळा ते पकडले देखील गेले. हा कट उधळणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठबळ देण्याऐवजी त्यांच्यावर कारवाई केली जाते. याचा अर्थ देशात अमली पदार्थ आणून युवकांना उडता पंजाब करण्याचे पाप भाजपा करीत आहे. शिवाय महाराष्ट्रात भाजपा सरकार वेगवेगळ्या केंद्रीय यंत्रणांचा वापर करून महाविकास आघाडी सरकारला नाहक त्रास देण्याचे कटकारस्थान व अभद्र चाळे करत असल्याचेहि पटोले यांनी म्हटले,

Protected Content