वन्यप्रेमींच्या जनगणनेच्या सुवर्ण दिवसाला मुकल्याची खंत…!

चाळीसगाव (दिलीप घोरपडे)। भगवान गौतम बुध्दाच्या जयंतीनिमित्त रात्रीच्या वेळेस जंगलांमध्ये वन्यजीवांची गणना करण्याची प्रथा आहे. मात्र लॉकडाऊन व संचारबंदीच्या काळात या सुवर्ण संधीचा लाभ घेता आला नसल्याची खंत वन्यप्रेमी व पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.

काल तथागत महामानव भगवान गौतम बुद्धांची जयंती बौद्ध पौर्णिमा हा दिवस म्हणजे जगाला शांती देणाऱ्या आणि चंद्राच्या शीतल प्रकाशाने अनेकांचे जीवन प्रकाशित करणाऱ्या भगवान बुद्धांचा जन्मदिवस त्याचबरोबर आम्हा वन्यप्रेमी साठी हा दिवस एक पर्वणीच या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ येत असल्याने चंद्राचा प्रकाश रात्रभर अत्यंत प्रखर राहत असल्याने संपूर्ण देशभर या दिवशी जंगलांमध्ये वन्यजीवांची गणना केली जाते. वनांमधील वेगवेगळा पाणवठ्यांवर मचान बांधून वनविभागाचे कर्मचारी व वन्यप्रेमी या प्राणी गणनेमध्ये सहभागी होतात. गेल्या दोन-तीन वर्षापासून मी स्वतः या प्राणी गणनेसाठी सहभागी व्हायचो खूप सुंदर अशी हि रात्र जायची, रात्रभर शांत, रात्री पाणी पिण्यासाठी येणाऱ्या विविध प्राण्यांचे संकेतात्मक आवाज त्यांच्या हालचाली जवळून पाहायला मिळतात आणि वनांमध्ये सरासरी कोणते कोणते प्राणी किती किती संख्येत आहेत याची गणना केली जाते.

मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये कोरोनाव्हायरस जगभर थैमान घातल असल्याने आपण कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या मोजण्यामध्ये इतके अडकलोय की त्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन केल्याने ही प्राणी गणना देखील यावर्षी रद्द करण्यात आली आणि वन्य प्राणी दरवर्षीप्रमाणे त्यांच्या या हक्काच्या खानेसुमारीस मुकले आहेत आणि आम्ही वन्यप्रेमी देखील या सुवर्ण दिवसाला मुकलो आहोत.

Protected Content