जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यतत्परतेचा इतर महसूलच्या कर्मचाऱ्यांनी आदर्श घ्यावा !

अमळनेर : ईश्वर महाजन

एकच ध्येय, एकच ध्यास! मदत करण्याचा ध्यास! गरज असेल तेथे धावून जाण्याचा ध्यास. लोकांचे भले करण्याचा, मग अशा प्रसंगी खिशाला चाट ,वेळेची कमतरता ,रजा, बरेवाईट प्रसंग !अनुकूल-प्रतिकूल प्रसंग इत्यादी आपसूकच आलेत. हे माहित असतं की, ज्याच्यासाठी ही सर्व धावपळ करावी त्यांना त्यांचे काही सोयरसुतक नसतं, तरी देखील कुठल्याही मान सन्मानाची अपेक्षा न करता केलेले हे खरे समाजकार्य ,हे एखाद्या व्रतस्थ, सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या व्यक्तीकडूनच होत असते ,अशी व्यक्ती म्हणजे जळगाव जिल्ह्याचे कार्यकुशल कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर होय. लोकशाही दिनी एका वृद्ध महिलेला तक्रारीचा पाठपुरावा करण्यासाठी पुन्हा पायपीट करत जळगावला येण्याची गरज भासू नये,म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवलेली कार्यतत्परता इतर महसूलच्या कर्मचाऱ्यांनी आदर्श घेण्यासारखीच आहे.

याबाबत हकीगत अशी की, लोकशाही दिनी जिल्ह्यातील एक वयोवृद्ध महिला तक्रार दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आली होती. त्या वृद्ध महिलेला पाहुन स्वतः जिल्हाधिकारी साहेब किशोरराजे निंबाळकर जागेवरून उठून महिलेकडे गेले आणि सांगितले की, तुम्हाला माझा मोबाईल क्रमांक दिला आहे, आता परत यायची गरच नव्हती. त्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांनी तक्रार अर्ज स्वतः घेऊन दुसऱ्या कागदावर हस्तक्षरात पोच दिली. ही सर्व हकीगत सबगव्हाणचे सरपंच नरेंद्र पाटील यांनी बघितली आहे. असे कर्तबगार अधिकारी किशोरराजे यांचे मनापासून अभिनंदन!

सशक्त प्रशासन उपक्रमशिल अधिकारी लाभले तर कार्यक्षेत्रात येणारे कनिष्ठ अधिकारी कर्मचारी व लाभ क्षेत्रात येणाऱ्या माणसांना आपल्या कृतीतून बदलवता येते आणि अधिकार्‍यांचा बदल बदलविण्याचा हेतू ही प्रामाणिक असेल तर सहयोगी व जनता ही प्रामाणिक पणे सहकार्य करते. अशा परस्पर समन्वयातून दोघांचा विकास साधता येतो. जळगाव जिल्ह्याचा सगळ्या क्षेत्रांमध्ये विकास साधणारे सामाजिक बांधिलकी जोपासणारे किशोर राजे निंबाळकर अत्यंत प्रामाणिकपणे काम करत असल्याचे नेहमीच दिसून आले आहे. लोकशाहीदिनी अनेकांच्या तक्रारी असतात. परंतु जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर एखादं वृद्ध महिलेची तक्रार वैयक्तिक लक्ष घालत सोडवतात, तेव्हा त्या महिलेच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा असतो. यावेळी संबंधित महिलेने जिल्हाधिकारी साहेबांना आशीर्वाद दिला. मग काय साहेबही भावनिक झाले. स्पर्धेच्या युगात अनेक अधिकारी पैशाच्या मागे धावत असताना, जळगावचे जिल्हाधिकारी आपल्या कामातील माणुसकी जपताना दिसत आहेत. त्यांच्या या कामाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Add Comment

Protected Content