व्यायमशाळेचे रखडलेले काम त्वरीत पुर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतीला निवेदन

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील चुंचाळे येथे शिवसेनेचे माजी आ.चंद्रकांत सोनवणे यांच्या निधीतून व्यायम शाळेचे जवळपास आठ लाखांचे काम मजुंर करण्यात आले होते. जवळपास तीन वर्ष उलटुनही व्यायमशाळेचे काम अपुर्ण असल्याने तरुण मुलांमध्ये नाराजीचे सुर उमटत आहे. या संदर्भात आज रोजी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने चुंचाळे ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आले. 

या निवेदनात म्हटल्यानुसार, सरपंच यांना दिलेल्या निवेदनात राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने म्हटले आहे की, गावातील स्थानिक आमदार निधीतून निर्माणास असलेली व्यायाम शाळा पूर्णत्वास नेऊन लवकरात लवकर लोकार्पण करण्यात यावी. आपणास सूचित करू इच्छितो की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असतांना संपूर्ण देशासह महाराष्ट्र राज्यात देखील टाळेबंदी लागू करण्यात आली होती. परंतु आता हळूहळू टाळेबंदी शिथिल केली जात असून सर्व कामकाज व व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. तसेच येणारा काळ हा सैन्य भरती व पोलीस भरतीचा असल्याने आपल्या परिसरातील मुलांनी शारीरिक पात्रता पूर्ण करण्यासाठी तयारी चालू केलेली आहे. परंतु शासन स्तरावरून कुठल्याही सोई-सुविधा पुरविलेल्या नाहीत. तसेच स्थानिक आमदार निधीतून २०१७ साली मुलांचे शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहावे, यासाठी व्यायाम शाळेच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. 

परंतु तीन वर्ष झाले तरीही ते काम अपूर्ण अवस्थेत आहे. तरी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आपणास विनंती करण्यात येते की, व्यायामशाळेचे कामाची चौकशी करून काम पूर्णत्वास न्यावे व मुलांना सोयी-सुविधा उपलब्ध करून घ्यावेत जेणेकरून मुलांचे भवितव्य सुधारेल व ते सैन्य व पोलीस भरतीमध्ये पात्र ठरून चुंचाळे गावाचे नाव नावलौकिक करतील.

तरी आपण  विनंतीला मान देऊन आपण दखल घ्यावी व मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी. अशा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. या निवेदनावर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे साकळी दहिगाव जिल्हा परिषद गट प्रमुख प्रतिक पाटील, समाधान पाटील, सागर धनगर, शाहरुख तडवी, विशाल पाटील, मुस्तुफा तडवी, राजेश पाटील, अकबर तडवी, समिर तडवी, राजु तडवी, अकबर दलशेर तडवी, फिरोज तडवी यांनी मागणी केली आहे.

Protected Content