जनरेटर चोरी प्रकरणी मुख्य आरोपीसह साथीदार अटकेत

पाचोरा प्रतिनिधी । सार्वे बु॥ येथील आदिवाशी शासकीय आश्रम शाळेतून जनरेटर चोरी प्रकरणी दाखल गुन्हातील मुख्य संशयीत आरोपीसह साथीदारांना आज (दि.२० नोव्हेंबर) रोजी नगरदेवळा पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान आरोपींना पाचोरा येथील न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, सार्वे बु” ता. पाचोरा येथील शासकीय आदिवाशी शाळेतून (दि. ३ नोव्हेंबर २०२०) रोजी जनरेटर चोरीला गेले होते. या प्रकरणी मुख्याध्यापक साहेबराव एरंडे यांच्या फिर्याद वरून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान पोलिसांनी तापसचक्रे फिरवुन यात १ संशयित अशोक हिलाल आहिरे (पिंप्री ता. पाचोरा) यास ताब्यात घेतले. त्याने सांगितले की, कमलेश पाटील नामक युवकाने मला हे कृत्य करण्यास सांगितले. त्यामुळे पोलीस कमलेश याच्या मागावर होते. आज (दि. २० रोजी) सकाळी मारुती व्हॅन घेऊन कमलेश नगरदेवळा गावाकडे येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, नगरदेवळा येथील सहाय्यक फौजदार ज्ञानेश्वर पाटील, विनोद पाटील, नरेश विसपुते, नरेंद्र शिंदे, मनोहर पाटील त्यांनी त्यास मोठ्या शिफातीने अटक केली.

संशयीत मुख्य आरोपीचा शाळेत नेहमी वावर :- 

सार्वे बु” ता. पाचोरा येथील आदीवाशी शाळेतून जनरेटर चोरीप्रकरण सुरुवातीला दडपण्याचा प्रयत्‍न झाला होता. परंतु गावातील सामाजिक कार्यकर्ते यांनी या विषयी मुख्याध्यापक व वसतीगृह अधिक्षक यांना धारेवर धरले असता चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या जनरेटर चोरी मागे अटक झालेला मुख्य आरोपी कमलेश पाटील यांचा शाळेत नेहमी वावर असल्याची बोलले जात आहे. शाळेतील प्रमुख अधिकारी व अन्य कर्मचारी यांच्याशी घनिष्ठ संबंध तसेच शालेय कामकाजमध्ये हस्तक्षेप करीत असत. यासाठी शाळेतील संबंधितांची मुख सहमती होती अशी चर्चा आहे. त्यामुळे जनरेटर चोरी मागे अजून शाळेतील कोणा कर्मचारीचा सहभाग आहे का ? यांचा देखील पोलीसांनी तपास करावा, अशी मागणी होत आहे.

त्या पञाचे कारण गुलदस्त्यात:  शाळेतून जनरेटर चोरी झाल्याची घटना झाल्यानंतर मुख्याध्यापक यांनी पोलिसांत चोरी ची तक्रार दिली होती दरम्यान तपास चालू असताना वसतीगृह अधिक्षक यांनी जनरेटर सापडले असे पञ दिले होते परंतु मुख्याध्यापक यांनी  ते सापडले नाही असे सांगीतले यामुळे जनरेटर चोरी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला हे उघड झाले आहे यामुळे अधिक्षक यांनी ते पञ पोलीसांना त्यामागचं कारण काय असा प्रश्न उपस्थित होत असून ते बाबत अजून शाळा प्रशासनाने माहीती दिली नाही त्यामुळे पञाचे कारण गुलदस्त्यात आहे याबाबत देखील पोलीसांनी तपास केला तर शाळेतील अनेक गैरप्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे.

एकलव्य संघटनेचे जिल्हा अध्यक्ष यांची शाळेस भेट..

सार्वे येथील आदीवासी आश्रम शाळेतील जनरेटर चोरी प्रकरणांत मुख्य आरोपीस अटक व्हावी, शाळेतील शौचालय ची दुरवस्था व नितकृष्ट कामाची चौकशी व्हावी यासाठी शाळेस भेट दिली असून लवकरच याविषयी संघटना आंदोलन करणार असल्याचे यावेळी सुधाकर वाघ यांनी सांगितले.

संशयित मुख्य आरोपी भाजप चा पदाधिकारी ? 

सार्वे बु” पाचोरा आदीवाशी आश्रम शाळेतील जनरेटर चोरी प्रकरणी अटक झालेला आरोपी कमलेश पाटील हा भाजप युवा मोर्चा पक्षाचा माजी पदाधिकारी ? असल्याचे बोलले जात आहे यामुळे राजकिय क्षेत्रात या विषयी चर्चा होत आहे.

 

Protected Content