महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालयात भगवान महावीर व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  प्रेम नगर येथील महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भगवान महावीर व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.डी.एस. पाटील होते. मा.अध्यक्षांच्या हस्ते भगवान महावीर व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.डी.बी. सोनवणे व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गीत गायन केले. यात सागर गायकवाड, पूनम ठाकूर, साक्षी गवळे व डिंपल येवले यांनी सहभाग घेतला. तसेच भारत चव्हाण व साक्षी गवळे यांनी भाषणे दिली. त्याचप्रमाणे हर्षल महाजन, पायल महाजन, दर्शना पवार, गायत्री जाधव, महेश महाले, कोमल सपकाळे, वैशाली चौधरी, रुपेश सोनार, अभिषेक सोहनी, साक्षी गवळे यांनी चित्रकला स्पर्धेत सहभाग नोंदविला. विद्यालयाचे उपशिक्षक श्री.मुकूंद वाणी यांनी भगवान महावीर व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देवून त्यांच्या शिक्षकवणीचे पालन करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.डी.एस. पाटील यांनी व्यक्तीमत्व विकासामध्ये त्याग, क्षमा, शांती या भगवान महावीर यांच्या शिकवणीची आजच्या काळात गरज असल्याचे नमूद केले. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका व संघठीत व्हा आणि संघर्ष करा या मूल्यांचे पालन करण्याचे आवाहन मुख्याध्यापक श्री.डी.एस.पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक उपशिक्षक श्री.एस.जी. चौधरी यांनी केले. विद्यालयातील वरिष्ठ लिपीक श्री.कमलचंद श्रीश्रीमाळ यांनी म्हटलेल्या मंगलपाठाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमास विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content