दगडफेक प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा | Demand Of Fair probe into stone pelting case Of Supreme Coloney Jalgaon

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात झालेल्या दगडफेकीच्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी मागणी मुस्लीम समाजातील मान्यवरांच्या शिष्टमंडळाने पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात ९ जुलै रोजी दोन गटात दगडफेक झाली होती. या प्रकरणी मुस्लीम समाजातील शिष्टमंडळाने पोलीस प्रशासनाला निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, या दगडफेकीत एका गटावर भादवी ३०७ प्रमाणे गुन्हा नोंदवून ८ आरोपींची नावे व १० अज्ञात आरोपी च्या विरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. दुसर्‍या गटातील १४ तरुणाविरुद्ध साधा दंगलीचा गुन्हा दाखल असल्याने हा अन्याय व भेदभाव असल्याने ते त्वरित दूर करा व ज्या तरुणाविरुद्ध भा द वी ३०७ प्रमाणे गुन्हा नोंद झालेला आहे त्यातील ३०७ कलम रद्द करण्यात यावे.

निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, ज्यावेळी दगडफेक झाली त्यावेळी इसरार बाबर देशमुख व जुबेर नुरा देशमुख हे दोघी आप आपल्या कामानिमित्त बाहेरगावी असताना सुद्धा त्यांची नावे एफआयआर मध्ये लिहिण्यात आली आहेत. त्यांचे कागदपत्रे पुरावे बघून त्यांची नावे त्वरित कमी करण्यात यावी तसेच दोघा बाजूंकडून ज्यांनी दगडफेक केली आहे त्या दोघी समाजातील तरुणांवर एकाच प्रकारे न्याय भूमिका घ्यावी अशा तीन मागण्याचे निवेदन पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप गावित यांना बुधवारी संध्याकाळी देण्यात आलेले आहे.

दरम्यान, जो कोणी दंगलीमध्ये नसेल तर त्याचे नाव नजर चुकीने किंवा साम्य नावामुळे आले असेल तर ती नावे कमी करण्यात येतील. तसेच तपास प्राथमिक स्वरूपात असल्याने भादवी ३०७ हे कलम पूर्ण चौकशी झाल्यावर त्याबाबत निर्णय घेण्यात येईल. तसेच दोघांकडे ज्या तरुणांनी कृत्य केलेले आहे त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे आश्वासन शिष्टमंडळाला पोलीस उप विभागीय अधिकारी संदीप गावित यांनी दिले.
जे लोक दगडफेकी च्या भीतीमुळे व पोलिसांच्या कारवाईमुळे आपली घरे सोडून निघून गेलेली आहे त्यांनी भीती न बाळगता आपल्या घरी परत यावे असे आवाहन सुद्धा सुप्रीम कॉलनी परिसरातील नागरिक व पोलिसांनी संयुक्तरीत्या केलेले आहे.

या शिष्टमंडळात मनीयार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, एडवोकेट वसिम काझी व एडवोकेट इमरान शेख, आसिफ हाजी, राजू पटेल, वाहेद सेठ,अकील मन्यार,मजीद पटेल,रऊफ खान,मंजूर पटेल, रमजान पटेल, आझाद पटेल, मुजाहिद पटेल, शब्बीर पटेल, अफजल मिया आदींचा समावेश होता

Protected Content