मंत्रीमंडळ विस्ताराचा गोंधळात गोंधळ : खातेवाटप मात्र तात्काळ होणार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटपाची उत्सुकता शिगेला पोहचली असतांनाच आता विस्तार पुन्हा एकला लांबणीवर गेल्याची माहिती समोर आली आहे.

 

भाजप आणि शिंदे गटाने एकत्रीतपणे येऊन सत्ता स्थापन करून एक वर्ष होत नाही तोच अजितदादा पवार यांचा गट देखील सत्ताधार्‍यांना येऊन मिळाल्याने राजकीय वर्तुळाला हादरा बसला. पवारांसह नऊ जणांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे आता नवीन मंत्र्यांना नेमकी कोणती खाती मिळणार ? याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली. यातच खाते वाटपासह मंत्रीमंडळ विस्तार केव्हा होणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले.

 

दरम्यान, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्ली येथे जाऊन आल्यानंतर तरी विस्तार होईल असे मानले जात होते. यासाठी अनेक नेत्यांनी आजचा मुहुर्त देखील सांगून टाकला होता. मात्र आज सकाळी अचानकपणे विस्तार लांबणीवर पडणार असून खातेवाटप हे लवकरच होणार असल्याची माहिती समोर आल्याने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.

Protected Content