चुंचाळे बोराळे गावात झालेल्या नुकसानीची आ. सोनवणे यांच्याकडून पाहणी

यावल प्रतिनिधी । काल रात्री तालुक्यातील चुंचाळे बोराळे गावात मुसळधार पाऊसासह वीज कोसळल्याने झालेल्या नुकसानीची पाहणी करून आ. लताताई सोनवणे यांनी मदतीचे दिले आदेश दिले आहे. 

दरम्यान, गावातुन जाणाऱ्या नदीला १५ वर्षानंतर नदीला मोठा पुर आल्याने दोघ गावांचा संपर्क तुटला होता तर एका ठीकाणी विज कोसळुन दोन बैलांचा मृत्यु तर दोन मोटरसायकल पुराच्या पाण्यात वाहुन गेल्याची घटना घडली असुन .या संदर्भात मिळालेली माहीती अशी की यावल तालुक्यातील पश्चिम क्षेत्रातिल असलेली चुंचाळे व बोराळे या गाव परिसरात आज सायंकाळच्या सुमारास ढगफुटीसदृष्य झाल्याने दोघ गावांना जोडणाऱ्या नदीला २००६नंतर अशा प्रकारचे मोठे पुर आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 

तर हा सर्व प्रकार ढगफुटीसारखा असल्याचे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले या सर्व वातावरणात विज कोसळल्याने बोराळे गावातील शेतकरी सुरेश प्रल्हाद धनगर यांच्या घरासमोर बांधलेल्या बैलांच्या अंगावर विज कोसळ्याने सुमारे एक लाख २० हजार रुपये किमतीच्या दोन बैलांचा मृत्यु झाला असुन, याशिवाय यांची संजयसिंग राजपुत आणी रमेश पिताबंर धनगर यांच्या १ लाख३०हजार रुपये किमतीच्या दोन मोटरसायकली देखील पुराच्या पाण्यात वाहुन गेल्याचे वृत्त आहे. दरम्यान चुंचाळे बोराळे गावांच्या उत्तरेकडील असलेल्या सातपुडा पर्वताच्या जवळ असलेल्या निंबादेवी तलावाच्या परिसरात ढगफुटी झाल्याचे वृत्त आहे. 

अचानक परिसरात मुसळधार पाऊस मागील पाच तासापासुन सुरू असल्याने अचानक गावातील नदीला मोठा पुर आल्याने दोघ गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांचे नुकसान झाले आहे . या पार्श्वभुमीवर महसुलच्या प्रशासकीय यंत्रणेकडुन सकाळ पासुनच नुकसानीच्या पंचनाम्याच्या कामास सुरूवात करण्यात आली होती या पंचनाम्याच्या कार्यवाही साकळीचे मंडळ अधिकारी पी .बी .कडनोर , ग्रामसेविका प्रियंका बाविस्कर यांच्यासह चुंचाळे गावाचे तलाठी प्रविण नेहते , विशाल राजपुत कोतवाल यांनी यात भाग घेतला दरम्यान या वेळी पावसामुळे नुकसान झालेल्या ९ घरांचे पंचनामे करण्यात आले तर पुराच्या पाण्यात वाहुन गेलेल्या दोघमोटरसायकल वाहन सापडले असल्याचे वृत्त आहे.

दरम्यान अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी तात्काळ चोपडा मतदारसंघाच्या आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे, तहसीलदार महेश पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तुषार उर्फ मुन्ना पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवी सोनवणे, युवा सेनेचे प्रमुख गोटु महाजन, योगेश पाटील, दिनेश पाटील, पराग महाजन, विभागप्रमुख सेनेचे सहसंघटक दिपक कोळी, पिटुं धनगर, चुंचाळे ग्रामपंचायतच्या उपसरपंच नाजिमा तडवी, स्वराज फाउंडेशनचे भरत चौधरी, ग्राम पंचायत सदस्य अनिल कोळी, रहेमान तडवी, सुकलाल कोळी व सुधीर चौधरी यांच्यासह आदी ग्रामस्थ बांधव याप्रसंगी उपस्थित होते.

यावेळी आमदार लता सोनवणे यांनी घरांचे नुकसान झालेल्या ग्रामस्थांना तात्काळ अन्नधान्य देण्याच्या सुचना यावेळी महसुल प्रशासनास दिल्यात.

 

Protected Content