तीन मुलींच्या अपहरणाचा फसला प्रयत्न

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील राणीचे बांबरूड येथे तीन मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न गावातील महिलांच्या प्रसंगावधानाने फसला.

या संदर्भातील माहिती अशी की, तालुक्यातील राणीचे बांबरूड येथे गुरूवारी दुपारी दोन तरूण भंडार्‍यासाठी धान्य जमा करण्याच्या नावाने गावात आले. काही जणांनी त्यांना गहू आणि तांदूळ दिले. यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतून घरी येणार्‍या तीन विद्यार्थीनींना बिस्कीटचे आमीष दाखवत घरी सोडून देणार असल्याचे सांगितले. यानुसार त्या तिन्ही मुलींना दुचाकीवर बसवून ते दोन तरूण निघाले.

दरम्यान, काही वेळापूर्वी धान्य जमा करणारे मुलींना घेऊन जात असल्याचे पाहून गावातील महिलांना शंका आली. त्यांनी त्या तरूणांची दुचाकी अडविली. यामुळे त्यांनी मुलींना सोडून तेथून पळ काढला. दरम्यान, महिलांनी आरडा-ओरड केल्याने ग्रामस्थ जमा झाले. मात्र तोवर त्या दोन्ही जणांना पोबारा केला होता.

Protected Content