यावल सार्वजनिक बांधकाम विभागात महामानवास अभिवादन

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयात बोधिसत्व महामानव भारतीय घटकाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

यावल येथील सार्वजनिक बांधकाम च्या उपविभागीय कार्यालयात आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम  उपविभाग कार्यालयाचे उप विभागीय अभियंता सी. डी. तायडे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक विकास जंजाळे , कनिष्ठ लिपिक रणवीर वाघ , कनिष्ठ लिपिक एम.बी. चौधरी , शिपाई धमेन्द्र अडकमोल आदी उपस्थित राहुन अभिवादन केले.

 

Protected Content