कोरोना : जिल्ह्यात आज ५ संक्रमित रूग्ण आढळले; १३ रूग्ण झाले बरे !

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने दिलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात ५ संक्रमित रूग्ण आढळून आले आहे. तर १३ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज चाळीसगाव व जामनेर तालुका वगळता सर्व तालुके निरंक असल्याचे दिसून येत आहे. 

तालुकानिहाय आकडेवारी

जळगाव शहर-०, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ -०,  अमळनेर -०,  चोपडा-०,  पाचोरा-०, भडगाव-०, धरणगाव-०, यावल-०,  एरंडोल-०, जामनेर-२, रावेर -०, पारोळा-०, चाळीसगाव-३, मुक्ताईनगर-०, बोदवड-० असे एकुण ५ बाधित रूग्ण आढळले आहे.

जळगाव जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ५१६ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३९ हजार ८२८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ११३ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज जामनेर व चाळीसगाव तालुका वगळता सर्व तालुके निरंक असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. 

Protected Content