पारोळा येथे वहन रथोत्सवानिमित्त वहनाच्या रंग कामाला वेग

vahan rangkam

पारोळा प्रतिनिधी । तालुक्याचे आराध्यदैवत बालाजी महाराज यांच्या गेल्या ३८० वर्षाची परंपरा असलेल्या ब्रह्मोत्सव वहनाला यंदा 29 सप्टेंबर पासून सुरुवात होत आहे. वहन रथोत्सवानिमित्त वहनाची दुरुस्त आणि रंगकामांना वेग आला आहे.

ब्रह्मोत्सवात दररोज वहनावर आकर्षक आणि उभेउभ बाहुले ठेवले जाऊन बालाजी महाराजांची मूर्ती आरूढ होऊन त्यांची शहराच्या मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढण्यात येते. रथावरील राक्षस, घोडे, सारथी अर्जुन, गरुड, अंगद, मारुती, इंद्रसभा, हत्ती, मोर, कपी सेना, संतमेळा, यांची उभेउभ १६२ बाहुले आहेत. या सर्व बाहुलेची दुरूस्ती गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. शहरात या ब्रह्मोउत्सवानिमित्त्‍ा भक्तिमय वातावरण निर्माण होत असते. यात बराच वेळ रथमागे पुढे करावा लागतो. या मुळे रथाचे वरचे ताल मिरवणुकीत खूप हलतात. यावर उपाय म्हणून रथ बाहेर काढताना रथाला जागेवर फिरविता यावे, म्हणून जॅकची व्यवस्था करण्यात येत आहे. रथाला कायमस्वरूपी जॅक लावला जात आहे. ही सर्व कामांची लगबग सुरू झाली असून शालीक लोहार आणि रमेश शिंपीस‍ह इतर सेवेकरी वहन दूरुस्ती आणि रंगकाम कामास लागले आहे.

Protected Content