येवतीत मुसळधार पावसामुळे घर कोसळले; सुदैवाने तिघे बचावले

bodwad paus

बोदवड प्रतिनिधी । तालुक्यातील येवती येथे काल झालेल्या मुसळधार पावसामुळे बोरसे घरातील कुटुंब रात्री गाढ झोपेत असतांना घरीची भिंत कोसळली. यात घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. तलाठी यांनी नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे.

याबाबत महिती अशी की, तालुक्यातील येवती येथे काल रात्री अचानक पणे आलेल्या मुसळधार पावसामुळे रहिवाशी हरी नथ्थू बोरसे यांच्या घराची भिंत अचानकपणे कोसळले. यावेळी तीन जण झोपलेले असतांना रात्री 9 वाजेच्या सुमारास मुसळधार पावसामुळे भिंत कोसळल्याने तिघेजण ढिगाऱ्याखाली दबले गेले. त्यावेळी अचानक मोठा आवाज झाल्याने शेजारी राहणाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून तिघांना ढिगाऱ्यातून सुखरूप बाहेर काढले. या सर्वांना किरकोळ जखमा वगळता, घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गरीब बोरसे कुटुंबियांचा संसार उघड्यावर पडला आहे, तरी या निवडणुकीच्या रणधुमाळीत कोणी या कुटुंबीयांच्या मदतीला येतं का हे पाहण्याजोग आहे, कुटुंबाची परिस्थिती एकदम हालाकीची असल्यामुळे त्यांची पूर्ण अपेक्षा लोक नेत्यांकडे आहे.

भिंतीला ताडपत्रीचा आधार 
पाऊस सतत सुरूच असल्यामुळे पडलेल्या भिंतीला ताडपत्रीचा आधार दिला आहे. कुटुंब वाचले असले, तरी घराचे मोठे नुकसान झाले आहे. कुटुंब रस्त्यावर आले असून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे, असे हरी बोरसे यांनी सांगितले. दरम्यान, घराच्या नुकसानीची पाहणी करून तलाठी आणि तहसीलदारांना अहवाल देणार असल्याचे सांगितले आहे.

Protected Content