पैसे मागितल्याच्या कारणावरून तरूणावर धारदार शस्त्राने वार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । व्यवहारातील उरलेले पैसे परत न दिल्याचा कारणावरून जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे एका तरुणाला चार जणांनी धारदार हत्यारांने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना शुक्रवारी १९ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, सूर्यभान हिम्मत पाटील वय-३९, रा.कुसुंबा ता.जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. पाईप कंपनी चालवून तो आपला उदरनिर्वाह करतो. त्याच्याच गावात राहणारे विकास पाटील याने काही पाईप सुर्यभान यांच्याकडून खरेदी केले होते. त्यामुळे पाईपाचे बाकी असलेले ५ लाख रुपये घेण्यासाठी सूर्यभान पाटील हे विकास पाटील याच्याकडे गेला होता. सुर्यभानने उरलेले पैसे मागितले याचा राग आल्याने विकास पाटील त्याच्यासोबत असलेले मंगेश निळे तसेच आकाश आणि चेतन (पूर्ण नाव माहित नाही) या चौघांनी धारदार वस्तूने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना शुक्रवार १९ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ८ वाजता मारहाण करणारे विकास पाटील, मंगेश निळे तसेच आकाश आणि चेतन (पूर्ण नाव माहित नाही) या चार विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील सोनार हे करीत आहे.

Protected Content