सप्तश्रृंगी गडावर पायी जाणाऱ्या भाविकांसाठी अमोलदादा पाटील मित्र मंडळातर्फे अल्पोहार

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सप्तश्रृंगी मातेच्या गडावर पायी जाणाऱ्या भाविकांसाठी अमोलदादा पाटील मित्र मंडळाच्या वतीने शितपेय आणि अल्पोहाराचे वाटप करण्यात आले.

चैत्रोत्सवानिमित्त खान्देशाची कुलस्वामिनी आई सप्तश्रृंगी मातेचा मोठा उत्सव साजरा होत असतो. या उत्सवासाठी लाखो भाविक-भक्त पायी व वाहनाने दर्शनासाठी येत असतात. या यात्रोत्सवासाठी खान्देशासह अनेक ठिकाणाहुन लाखोंचा संख्येने भाविक-भक्त हे पायी चालत वणी गडावर येत असतात. या पायी चालणाऱ्या भाविक-भक्तांसाठी अनेक दाते आपापल्या परिने सेवा देत असतात. जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोलदादा पाटील यांच्या संकल्पनेतुन दरवर्षी या भाविक-भक्तांसाठी अल्पोपहाराचे वाटप करण्यात येते. यावर्षी देखील मा.अमोलदादा पाटील मित्र मंडळातर्फे पायी चालणाऱ्या भाविक-भक्तांसाठी वणी गड येथे अल्पोपहार व शितपेयाचे वाटप करण्यात आले. या वाटपासाठी शेतकी संघाचे संचालक साहेबराव पाटील, पंकज मराठे, बापु मराठे, उपशहरप्रमुख नितीन बारी, योगेश लोहार, राज पाटील, प्रकाश पाटील, संकेत पाटील, सागर मराठे यांनी सेवा दिली.

Protected Content