मुक्ताईनगर व्यापारी मंचची लॉकडाऊन तात्काळ उठविण्याची मागणी (व्हिडिओ)

 

मुक्ताईनगर प्रतिनिधी । विकेंड लॉकडाऊनच्या नावाखाली सुरु केलेले पूर्ण लॉकडाऊन तत्काळ उठविण्यात यावा अशी मागणी आज मुक्ताईनगर व्यापारी मंचातर्फे तहसील कार्यालय येथे निवेदनात करण्यात आली आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की,  ब्रेक द चेन या ब्रीद वाक्याने महाराष्ट्रात विकेंड लॉकडाऊन सुरु करण्याची घोषणा झाली होती परंतु दुसऱ्याच दिवशी संपूर्ण लॉकडाऊन राबविण्याबाबत प्रशासनाणे उचललेली पावले अत्यंत निषेधार्थ आहे. अशाप्रकारचे लॉकडाऊन आम्हा सर्व व्यापारी आणि व्यावसायिक बांधवापुढे मोठे आर्थिक संकट उभे राहणार आहे. त्यामुळे आम्ही याचा तीव्र निषेध करतो अशा प्रकारचे निवेदन आज मुक्ताईनगर व्यापारी मंचाचे अध्यक्ष नितीन (बंटी) जैन यांचे अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय येथे दोन व्यापाऱ्यांचा उपस्थितीत नियमाचे पालन करून देण्यात आले निवेदनावर १००-१५० व्यापारी बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

प्रशासनास दिला दोन दिवसांचा अल्टीमेटम 

याबाबत व्यापारी मंचाचे अध्यक्ष नितीन जैन यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, राज्य सरकारतर्फे विकेंड लॉकडाऊनच्या नावाखाली संपूर्ण लॉकडाऊन लावण्यात आले आहे.  त्यामुळे व्यवसायिक बांधव छोटे-मोठे विक्रेते त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.  मागच्याच वर्षी संपूर्ण वर्षभर राज्यामध्ये कडक निर्बंध सहित लॉकडाउन लावण्यात आले होते. त्याच्यातूनच आता कसाबसा हा व्यापारी छोटे-मोठे विक्रेते उभे राहताना दिसत आहे. त्यामध्येच जर अशी भूमिका राज्य सरकार घेत असेल तर त्याचा आम्ही तीव्र निषेध दर्शवितो.   दोन दिवसात निर्णय न झाल्यास सोमवारपासून आम्ही दुकाने उघडी ठेवू असा इशारा दिला आहे. 

 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/751069505599801

 

Protected Content