मलेरिया सुपरवायझर विजय वानखेडे सेवानिवृत्त

 

शेंदूर्णी, प्रतिनिधी । जामनेर तालुका आरोग्य पर्यवेक्षक व शेंदूर्णी येथील रहिवासी विजय माधवराव वानखेडे हे महाराष्ट्र राज्य आरोग्य खात्यातील आपली ३२ वर्षाची सेवा बजावून गुरुवार दि. ३० एप्रिल रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत.

विजय वानखेडे हे सेवेत असतांना जामनेर, पाचोरा, भुसावळ, जळगाव या तालुक्यातील विविध गावांमध्ये त्यांनी मलेरिया सुपरवायझर म्हणून कार्य केले आहे. ते पदोन्नतीनंतर भुसावळ, जामनेर येथे तालुका आरोग्य सुपरवायझर म्हणुन कार्यरत होते. महाराष्ट्र राज्य हिवताप व हत्तिरोग कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखा जळगावचे जिल्हा सरचिटणीस म्हणून कार्य केले आहे. राज्य शाखेचे सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे त्यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने सत्कार करण्यात आला. विलास पाटील(शेंदूर्णी) यांनी त्यांच्या घरी जाऊन कोरोना प्रतिबंधक सॅनिटाझयर भेट देऊन सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करून भावी आयुष्यात सुख समृद्धी प्राप्त होण्यासाठी कामना केली. माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गरुड यांनीही प्रदीर्घ सेवाकाल पूर्ण करून आरोग्य खात्यातील कार्याचा गौरव करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Protected Content