मनसेच्या वतीने रुग्णालय परिसर स्वच्छता मोहीमेसह रुग्णांना फळे व बिस्कीट वाटप

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालय  येथे मनसेच्या वतीने फळे आणि बिस्कीट वाटप करण्यात आली. याप्रसंगी श्रम दानही करण्यात आले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि.१४ जून रोजी येथील उपजिल्हा रुग्णालय येथे मनसेच्या वतीने रुग्णांना फळे आणि बिस्कीट वाटप करण्यात आले. त्यानंतर रुग्णालय परिसर आणि आवार स्वच्छ करण्याचे काम उपस्थित शासकीय अधिकारी व मुक्ताईनगर तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी सहभागी होत केले.

जिल्हा उप रुग्णालय अधीक्षक डॉ.योगेश राणे, तालुका चिकित्सक डॉ.चव्हाण साहेब, डॉ.इम्रान, आरोग्य सेवक प्रदीप काळे, मनसे तालुका अध्यक्ष मधुकर भोई, मंगेश कोळी, राहुल वाघ, प.स.गणअध्यक्ष सुनील कोळी, उचंदा गणअध्यक्ष आकाश कोळी, गजानन पाटील, निवृत्ती कोळी, प्रहारचे अजित पाटील, गणा कोळी आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!