लोंबकळणाऱ्या वीजतारा उंचावण्याचे काम सुरू

वरणगाव प्रतिनिधी । येथील अक्सानगर भागातील प्रभाग क्रमांक सात व आठमधून गेलेला रिंग रोडचा कामामुळे रोडची उंची वाढल्याने तारा खाली लोंबकळत होत्या. याबाबतचे शिवसेनेतर्फे कनिष्ठ अभियंता महावितरण वरणगाव शहर व नगरपरिषद वरणगाव यांना निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाची दखल घेत महावितरणाने खाली आलेल्या तारा उंच करण्याचे काम सुरु केले. 

दोन दिवसापूर्वी शिवसेना तालुकाप्रमुख समाधान महाजन उपजिल्हा संघटक विलास मुळे अल्पसंख्यांक उपजिल्हा संघटक सईद मुल्लाजी स्थानिक कार्यकर्ते  शेख अजहर शेख बुढण सईद पिंजारी पवार राहुल वंजारी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता  पाटील यांनी कार्यतत्परता दाखवून सदर काम करणे बाबत त्वरित लाईनमन बावणे यांच्यासोबत चर्चा करून सदर काम करणे बाबत चे आदेश दिले त्यानंतर आज दि.31 मे 2021 रोजी महावितरण तर्फे संबंधित तारा रोडच्या दोन्ही बाजूच्या खांबांवर एक्सटेन्शन लावून तारा उंच करण्यात आल्या व ताणून व्यवस्थित बसवण्यात आल्या.

 यामुळे संबंधित परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले व शिवसेनेतर्फे महावितरणचे कनिष्ठ अभियंता पाटील  यांचे आभार व्यक्त केले आहे बऱ्याच वर्षापासून रखडलेले हे काम बऱ्याच वेळा विनंती अर्ज विनवण्या करून संबंधित महावितरण व नगर परिषदेमार्फत पूर्ण केले गेले नव्हते स्थानिक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या लक्षात ही बाब आणून दिल्यानंतर शिवसेना तालुकाप्रमुख समाधान महाजन यांनी स्वतः लक्ष घालून सदरचे काम मार्गी लावून दिले व पूर्ण करून दिले याबाबत नागरिकांनी शिवसेनेचे आभार व्यक्त केले आहे यावेळी उपजिल्हा संघटक विलास मुळे अल्पसंख्यांक उपजिल्हा संघटक सईद मुल्लाजी स्थानिक कार्यकर्ते शेख अजहर  शेख बुढण शेख असिफ भंगारवाले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी शहराध्यक्ष संतोष माळी खान कमर मास्टर यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते ..

 

Protected Content