वाढदिवसानिमित्त गरजूंना मिठाई वाटप

यावल प्रतिनिधी । यावल शिवसेना शहरप्रमुख जगदीश कवडीवाले यांची कन्या सायली कवडीवाले हिने आपला वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करत गोरगरिबांना शासन मान्य शिवशक्ती बचतगट संचालित शिवभोजन थाळी केंद्राच्या माध्यमातून प्रत्येक पार्सल थाळीद्वारा मिठाईचे वाटप करत सामाजीक बांधीलकीतुन एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे. 

कु.सायली कवडीवाले हिने आपल्या वाढदिवसाचा इतत्र खर्च न करता थाळी केन्द्रावर मोफत भोजन थाळी घेणाऱ्या गरिबांना मिठाई वाटप करून नव्या पिढी समोर आदर्श ठेवला.यावल येथील शिवभोजन केंद्रावर सुरवातीला  स्वराज्य फाउंडेशन चे अध्यक्ष भरत चौधरी व शिवसेना शहर प्रमुख जगदीश कवडीवाले यांचे हस्ते दीपप्रज्वलनाने व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेला हार अर्पण करून उपस्थित गरजू गरीब नागरिकांना शिवभोजन थाळी पार्सल चे मिठाई सह वाटप करण्यात आले.यावेळी भरत चौधरी,शिवसेना तालुका उपप्रमुख शरद कोळी,शहर उपप्रमुख संतोष धोबी,तालुका संघटक आर के चौधरी सर, शिवसेनेचे विभाग प्रमुख योगेश राजपूत यांचे हस्ते वाटप करण्यात आले.या साठी शिवभोजन केंद्र संचालक व त्यांचे सहकारी यांनी सहकार्य केले.या स्तुत्य उपक्रम बद्दल कु सायली कवडीवाले हिला वाढदिवसा निमित्त अनेकांनी शुभेच्छा देऊन कौतुक केले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.