अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेचा विनयभंग


चाळीसगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या पंचवीस वर्षीय महिलेला तिचे अश्लील फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देवून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील एका गावात २५ वर्षीय महिलाही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. दरम्यान त्यांच्याच गावात राहणारा संशयित आरोपी विनोद मोरसिंग पवार याने महिलेचे अश्लील फोटो काढून तिला तिच्या मोबाईलवर टाकून विनयभंग केला आहे. तसेच शरीर संबंध ठेवले नाही तर फोटो आणि व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्राम आणि सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी देखील धमकी दिली होती दरम्यान या त्रासाला कंटाळून महिलेने चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार संशयित आरोपी विनोद मोर्सिंग पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार करीत आहे.