पतीला मारहाण करत महिलेचा विनयभंग !

अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील बाहेरपुरा भागात पोस्टर लावण्यावरून झालेल्या वादातून झालेल्या पतीला मारहाण करत असतांना भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या एका २३ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर शहरातील बाहेरपूरा भागात २३ वर्षीय महिला ही आपल्या पतीसह वास्तव्याला आहे. सोमवारी ८ एप्रिल रोजी रात्री १०.३० वाजता त्यांच्या परिसरात पोस्टर लावण्याच्या कारणावरून दादा सुरेश मोरे, बापू सुरेश मोरे, मनोज सुरेश मोरे आणि पवन बिऱ्हाडे सर्व रा. फरशी रोड, अमळनेर यांचा महिलेचे पती यांच्यासोबत वाद झाला. या वादातून महिलेच्या पतीचा मारहाण करण्यास सुरूवात केली. पतीला मारहाण होत असल्याचे पाहून महिला भांडण सोडविण्यासाठी गेले असता चौघांनी महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने दुसऱ्या दिवशी मंगळवार ९ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता महिलेने अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिल. त्यानुसार दादा सुरेश मोरे, बापू सुरेश मोरे, मनोज सुरेश मोरे आणि पवन बिऱ्हाडे सर्व रा. फरशी रोड, अमळनेर यांच्या विरोधात अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जयंत सपकाळे हे करीत आहे.

Protected Content