ट्रकवर दुचाकी आदळल्याने अनोळखी तरूणाचा मृत्यू ; पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद

चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।शहरातील मालेगाव रोडवरील पुलाखाली ट्रकवर दुचाकी आदळल्याने एका अनोळखी तरूणाचा जागेवर दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नातेवाईकांनी मयताची ओळख पाटवावी असे आवाहन पोलीसांनी केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील मालेगाव रोडवरील पुलाखाली एमएच १८ बीजी ९७४० हा १४ टायरचा ट्रक उभा होता. त्यावेळी दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीझेड ६०३६) वरील अनोळखी तरूण हा दुचाकीने जात होता. त्यावेळी भरधाव वेगाने जात असलेल्या दुचाकीस्वाराचा दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची दुचाकी उभ्या ट्रकवर आदळली. त्यामुळे या अपघातात अनोळखी तरूणाचा जागेवरच मृत्यू झाला. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक बिरारी हे करीत आहे.

Protected Content