किरकोळ कारणावरून महिलेवर प्राणघातक हल्ला !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगरात राहणाऱ्या एका महिलेला गाडीची चावी मागितल्याच्या कारणावरून त्याला तीन जणांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि हातातील दगड डोक्यात टाकून दुखापत केल्याची घटना शनीवारी २८ जून रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी रात्री ८ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, समीमबी अकबर कुरेशी वय ३८ रा. हरीविठ्ठल नगर, जळगाव ह्या महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्याच्या मुलाच्या गाडीच चावी घेतल्याने ती मागितली. या रागातून शनिवारी २८ जून रोजी दुपारी ४.३० वाजता चंदू सुतार, चिक्या उर्फ अमोल शंकर कोकाटे, हेमंत प्राण सर्व रा. हरीविठ्ठल नगर यांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच एकाने हातातील दगड त्यांच्या डोक्यात टाकून दुखापत केली. यानंतर महिलेला जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी महिलेने रामानंद नगर पोलीस ठाण्यात‍ फिर्याद दिली. त्यानुसार चंदू सुतार, चिक्या उर्फ अमोल शंकर कोकाटे, हेमंत प्राण सर्व रा. हरीविठ्ठल नगर यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रविण जगदाळे हे करीत आहे.