एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कासोदा पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी वाळू चोरीच्या घटनेत मोठी कारवाई करत दोन ब्रास वाळू भरलेला एक ट्रक ताब्यात घेतला आहे. ही कारवाई २८ एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ताडे गावाच्या पुढे, एरंडोल येथे करण्यात आली. याबाबत कासोदा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इरफान नबी पठाण (वय ३३ वर्ष, रा. पाटील मोने अंधारी, ता. सिल्लोड, जि. संभाजीनगर) हा त्याच्या ताब्यातील ट्रक (क्र. एमएच ४६ बीबी ५४२१) मध्ये बिनपरवाना वाळूची चोरटी वाहतूक करत होता. पोलिसांनी सापळा रचून हा ट्रक दोन ब्रास वाळूसह जप्त केला. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ६ हजार रुपये इतकी असून, त्यात ट्रकची किंमत १ लाख रुपये तर दोन ब्रास वाळूची किंमत ६ हजार रुपये आहे.

या प्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक श्रीकांत अंकुश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश गोविंदा पाटील, पोलिस नाईक अकिल मुजावर यांनी ही कारवाई केली.



