जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉप जवळ पार्कींगला लावलेल्या वाहनाचे कुलूप तोडून दुकानातून ४ लाख रूपये किंमतीचे सिगारेटचे पाकीट चोरून नेल्याची धक्कादायक घटना २८ जून रोजी सकाळी ९ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी सकाळी ९ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चंद्रशेखर जवरीलाल राका वय ५० रा. नवीपेठ जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला असून पान टपरी चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे गोविंदा रिक्षा स्टॉप येथे पानटपरी आहे. २७ जून रोजी रात्री ८ ते २८ जून रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानासमोर पार्कींगला लावलेले वाहन क्रमांक (एमएच १८ सीवाय ०१२३) चे दरवाजाचे कुलूप तोडून त्यात ठेवलेले ४ लाख रूपये किंमतीचे सिगारेटचे पाकीट चोरून नेले. हा प्रकार शनिवारी २८ जून रोजी सकाळी ९ वाजता समोर आला. याबाबत चंद्रशेखर राका यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार रात्री ९ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल पाटील हे करीत आहे.