Home Cities जळगाव महाडीबीटीद्वारे प्रमाणित बियाणे वितरणासाठी ऑनलाईन अर्ज सुरू !

महाडीबीटीद्वारे प्रमाणित बियाणे वितरणासाठी ऑनलाईन अर्ज सुरू !


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून खरीप हंगाम २०२६-२७ साठी प्रमाणित बियाणे वितरण व पिक प्रात्यक्षिक योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही योजना महाडीबीटी प्रणालीद्वारे राबविण्यात येत असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (तेलबिया), राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान तसेच कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत ही अंमलबजावणी होत आहे. यामध्ये प्रमाणित व सुधारीत वाणांचे दर्जेदार बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे.

तूर, मूग, उडीद, खरीप ज्वारी, बाजरी आणि हरभरा या पिकांसाठी शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे. या योजनेमुळे गळीतधान्य, अन्नधान्य, तृणधान्य व कडधान्य पिकांचे क्षेत्र व उत्पादन वाढविण्यास मदत होणार आहे.

महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करण्यासाठी विशेष विंडो उपलब्ध करून देण्यात आली असून इच्छुक शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज करावेत, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित उपविभागीय कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.


Protected Content

Play sound