राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे हिवाळी श्रमसंस्कार शिबीर उत्साहात

dhanaji clg 2

फैजपूर प्रतिनिधी । तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबीर रावेर तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा मोहमांडली येथे आयोजित करण्यात आले होते.

आपल्यावर अनेक ऋण असतात. त्याची परत फेड आयुष्यात करावी लागते. समाजची सेवा करण्यासाठी विद्यार्थी दशेत राष्ट्रीय सेवा योजना एक उत्तम व्यासपीठ असून प्रत्येक स्वयंसेवकाने आप-आपली जबाबदारी ओळखून या संधीचे सोने करावे, असे प्रतिपादन धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.पी.आर.चौधरी यांनी केले. ते आयोजित शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

यांची होती उपस्थिती
या शिबिराचे उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.पी.आर.चौधरी, उपप्राचार्य प्रा.अनिल सरोदे, नूरखा तडवी, सरपंच मोहमांडली, एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.शरद बिऱ्हाडे, प्रा.डॉ.रवी.एन.केसुर, प्रा.डॉ.सरला तडवी यांच्या उपस्थितीत पार पडले. तर तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष आमदार शिरीष चौधरी, चेअरमन लीलाधर विश्वनाथ चौधरी, उपाध्यक्ष प्रा.डॉ.एस.के.चौधरी, व्हा.सचिव प्रा.एम.टी.फिरके, व्हा चेअरमन प्रा.के.आर.चौधरी आणि पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

कार्यक्रमाची सविस्तर माहिती यांनी दिली
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन.एस.एस.अधिकारी प्रा.डॉ.शरद बिऱ्हाडे यांनी केले. त्यांनी एन.एस.एसच्या सात दिवसातील विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. सात दिवसांचा बौद्धिक, मानसिक, शारीरिक, विकासाबरोबरच समाजाच्या उपयोगी आयुष्याचे काही तास द्यावेत ही शिकवण सहभागी स्वयंसेवकांना मिळणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.सरला तडवी तर आभार प्रा.डॉ.रवी केसुर यांनी केले.

यांनी केले परिश्रम
शिबिर यशस्वितेसाठी धनाजी नाना महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एकक विद्यार्थी विकास विभाग, युवती सभा, यांच्यासोबतच प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे.

Protected Content