यावल महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी सैनिक प्रशिक्षण कार्यशाळा 

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कला, व वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कबचौ उमवि जळगाव, विद्यार्थी विकास विभाग व महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रोजी सैन्य प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यशाळेचे उद्घाटन एन. मुक्टोचे माजी अध्यक्ष व धुळे येथील एल. एन. सरदार महाविद्यालयाचे प्राचार्य दादासाहेब डॉ. संजय श्रीराम सोनवणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे होत्या.

कार्यशाळेच्या प्रास्ताविकात उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार यांनी कार्यशाळा आयोजित करण्यामागील भूमिका विशद केली. कार्यशाळेचे उद्घाटन भारत माता व कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आले.

यावेळी उद्घाटक प्राचार्य दादासाहेब डॉ. संजय सोनवणे यांनी सैनिक प्रशिक्षण कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक व बौद्धिक विकास होऊन योग्य व सकारात्मक दिशा मिळून भारतमातेचे संरक्षण करण्याची संधी मिळते असे उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन केले.

अध्यक्षीय भाषणात प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी देशाच्या हिताला प्राधान्य देऊन राष्ट्राचा सन्मान राखला पाहिजे तसेच युवकांनी सैनिक प्रशिक्षण कार्यशाळेमधील विविध गुण व कौशल्य आत्मसात करून आकाशात चमकून दाखवायचे आहे, असे प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले.

सदर कार्यशाळेत सकाळी 7.00 ते 10.00 मैदानी प्रशिक्षण होऊन दुपारी बौद्धिक मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले.

बौद्धिक चर्चा सत्रात फैजपूर येथील डी.एन‌ महाविद्यालयाचे एनसीसी लेफ्टनंट डॉ.आर. आर. राजपूत यांनी मार्गदर्शन केले की युवकांमध्ये नेतृत्व स्वीकारण्याची तयारी असली पाहिजे व आपण भविष्यात काय करू शकतो याची क्षमता ओळखून ध्येय निश्चित केले पाहिजे. दुसऱ्या सत्रात ए. एस. आय. महेंद्र पाटील यांनी विचार व्यक्त केले की सैन्य दलात विविध क्षेत्रात पदभरती केली जाते त्या पदांसंदर्भात माहिती प्राप्त करा. त्यासाठी लेखी परीक्षा व मैदाना वरील सराव महत्त्वाचा आहे. तसेच तिसऱ्या बौद्धिक व्याख्यानात जळगाव येथील नुतन मराठा महाविद्यालय चे एन. सी. सी. लेफ्टनंट प्रा. शिवराज पाटील यांनी विद्यार्थ्यांना कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर जिद्द व चिकाटी धरून त्याग करून मेहनत करावी लागते त्यातून व्यक्तिमत्वाचा विकास साधला जातो असे मार्गदर्शनपर भाषणात केले.

कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून जळगाव येथील जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. गौरी राणे, भुसावळ येथील नाहाटा महाविद्यालयाचे प्रा. ई. जी.नेहते (अधिसभा सदस्य, कबचौ उमवि, जळगाव) व ऐनपूर महाविद्यालयाचे डॉ. के. जी. कोल्हे (अधिसभा सदस्य, कबचौ उमवि, जळगाव) उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ. गौरी राणे यांनी युवकांनी स्पर्धा परीक्षेत अपयश आले तरी खचून न जाता युवकांनी निर्धाराने सामोरे जावे असे मार्गदर्शन केले. तसेच अशा प्रकारची कार्यशाळा आयोजन करणे हा स्तुत्य उपक्रम असून तसेच ग्रामीण भागातील युवकांमध्ये प्रेरणा ज्योत जागवून मार्गदर्शनाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल कौतुक केले. डॉ. के. जी. कोल्हे यांनी राष्ट्राचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे मूलभूत कर्तव्य आहे. राष्ट्रप्रेम प्रत्येकाला असले पाहिजे. राष्ट्रप्रेम प्रति समाजव्यवस्थेचे रक्षण करणे हेही महत्त्वाचे आहे, असे मार्गदर्शन केले. तसेच प्रा. ई. जी. नेहते यांनी मार्गदर्शनात म्हटले की जर सैनिक प्रशिक्षण आपल्या राष्ट्रात अनिवार्य केले तर जगातली कोणतीही शक्ती देशाला हरवू शकत नाही. युवकांनी मानसिक दृष्ट्या सक्षम होणे गरजेचे आहे.

कार्यशाळा आयोजना बाबत प्रशिक अढायगे (वरणगाव महाविद्यालय) व दिक्षा अडकमोल (यावल महाविद्यालय) यांनी मनोगत व्यक्त केले.सदर कार्यशाळेत नुतन मराठा महाविद्यालय (जळगाव), डी. डी. एन. भोळे महाविद्यालय (भुसावळ) कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (वरणगाव) व आयोजक यावल महाविद्यालयातील असे एकूण 68 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. कार्यशाळेचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.

सदर कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. सुधा खराटे यांनी केले. उद्घाटन कार्यक्रमाचेआभार विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. एस. पी. कापडे यांनी तर समारोप कार्यक्रमाचे आभार कार्यशाळेचे संयोजक डॉ. एच. जी. भंगाळे यांनी मानले.

कार्यशाळा यशस्वीतेसाठी उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील, उपप्राचार्य प्रा संजय पाटील, आय क्यू. ए. सी. चे समन्वयक प्रा. एस. आर. गायकवाड, डॉ. आर. डी. पवार, डॉ. पी. व्ही. पावरा, श्री. मनोज पाटील, मुकेश येवले, श्री डी‌. एन.मोरे, एस. व्ही. चव्हाण, ई. आर. सावकार, श्री अरुण सोनवणे, प्रा. सुभाष कामडी, प्रा. मयूर सोनवणे, प्रा.एम. पी. मोरे, प्रा. नरेंद्र पाटील, मिलिंद बोरघडे, डी. डी. चौधरी, संतोष ठाकूर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content