ए.टी.झांबरे विद्यालयात सावित्रीमाईंना अभिवादन

at zambre vidyalay

जळगाव प्रतिनिधी । ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका ‘सवित्रीबाई फुले’ यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिन म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक डि.व्ही. चौधरी, पर्यवेक्षिका प्रणिता झांबरे यांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण केला.

रोहिनी चंदनकर या विद्यार्थिनीने बालिकादिनाचे महत्व विशद केले. पायल पाटील हिने सावित्रीबाई यांच्या बद्दलची महती सांगीतली. स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत क्रांतीज्योती सावित्री बाई शिक्षणाची महती गातांना म्हणतात,” शिक्षणाने मनुष्यत्व येते, पशुत्व हरते पाहा! विद्या हे धन आहे रे, श्रेष्ठ सार या धनाहून, तिचा साठा जयापाशी, तो ज्ञानी मानिती जन !! तर हर्षला इंगळे हिने “ज्ञानाई” सावित्री बाईंचे बालपण व त्यांचे सामाजीक कार्य विशद केले.

श्रावणी याज्ञीक हिने “बेटी बचाव बेटी पढाव” याबद्दल जनजागृतीपर संदेश दिला तर रोशनी पाटील या विद्यार्थिनीने “स्त्री भ्रूण हत्या” बद्दल आपले मत मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रतिभा लोहार, वर्षा राणे, पुनम कोल्हे यानीं काम पाहिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आदिती पवार हिने केले तर आभार प्रदर्शन अश्विनी बडगुजर हिने केले डी.ए. पाटील, चंदन खरे, ए.डी. तायडे यांनी सहकार्य केले.

Protected Content