विद्यापीठाच्या संकेतस्थळावर निर्वाचक गणाची दुरूस्त मतदार यादी प्रसिध्द

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर व्यवस्थापन प्रतिनिधींच्या गटातून निवडून द्यावयाच्या सदस्यांच्या निर्वाचक गणाची दुरूस्त मतदार यादी विद्यापीठाने २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी संकेतस्थळावर प्रसिध्द केली असून याबाबतीत लेखी अपील सादर करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. व्यवस्थापन प्रतिनिधींमधून अधिसभेवर ०६ सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. या बाबतीत विद्यापीठाने तात्पुरती निर्वाचक गणांची यादी प्रसिध्द करून आपल्या नावासमोर काही दुरुस्ती /बदल किंवा काही हरकत /आक्षेप असल्यास त्यासंदर्भातील लेखी अर्ज आवश्यक त्या पूरक कागदपत्रांसह दि. २३ नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली होती. प्राप्त झालेल्या कागदपत्रांसह सादर केलेल्या अर्जांची विद्यापीठ शासन अधिसूचना /परिनियमातील निकषांप्रमाणे तपासणी करून योग्य त्या दुरूस्त्या करून निर्वाचक गणाची दुरूस्त मतदार यादी आज दि. २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी विद्यापीठाचे संकेतस्थळ आणि प्रशासकीय इमारतीच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द केली आहे. या यादीचे अवलोकन करून संबंधितांनी याबाबत काही विवाद असल्यास कुलगुरूंकडे अपील करता येईल. या दुरूस्त यादीबाबत लेखी अपील आवश्यक त्या कागदपत्रांसह ३० नोव्हेंबर रोजी सायं. ५ वाजेपर्यंत विद्यापीठाच्या निवडणूक शाखेत (कक्ष क्र. ४१०) प्रत्यक्ष सादर करणे आवश्यक आहे. विहित तारीख वेळेनंतर प्राप्त होणाऱ्या अपिलावर कोणत्याही परिस्थितीत कार्यवाही केली जाणार नाही. याची नोंद घ्यावी असे कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विनोद पाटील यांनी कळविले आहे.

Protected Content