यावल येथे कॉप शॉपचे उद्घाटन

यावल – लाईव्‍ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । केंद्र व राज्य शासनाच्या अंतर्गत गावपातळीवर राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत लाभार्थ्यांना शासन घरकुल कशी बांधणार यासाठी पंचायत समिती, यावल येथील निवासस्थानी डेमो हाऊस उभारण्यात आले. या कॉप शॉपचे उद्घाटन यावल पंचायत समितीच्या प्रभारी गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड (बोरसे) यांच्या हस्ते करण्यात आले.

यावल पंचायत समितीच्या आवारात उभारण्यात आलेल्या डेमो हाऊसला लाभार्थी बघण्यासाठी  येत असुन. या कॉप शॉप मध्ये शासनाच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोनोत्री अभियान बचत गटामार्फत उभारण्यात आलेल्या डेमो हाऊसमध्ये कॉप शॉपचे उद्घाटन प्रसंगी प्रभारी गटविकास अधिकारी गायकवाड यांनी केले. यावेळी ग्रामीण पातळीवरील घरकुलांचे लाभ घेणाऱ्या ग्रामस्थ लाभार्थ्यांनी या शॉपला भेट देवुन या संदर्भातील विस्तृत माहीती जाणुन घ्यावी, असे आवाहन नागरीकांना केले आहे.

या कॉप शॉपच्या उद्धघाटनाप्रसंगी ग्रामपंचायत विस्तार अधिकारी हबीब तडवी, ग्राम पंचायत विस्तार अधिकारी किशोर सपकाळे, उमेदचे प्रभाग समन्वयक सोपान बादशहा, अमोल झाडे, उदयभान कोळी, शरद शेंडे व धिरज हिवराळे, के.टी. देवराज (कृषी अधिकारी), आर.पी. देशमुख, उमेश मुंडके, दिनेश पाटील, घरकुल प्रोग्रामर मिलिंद कुरकुरे, किरण सपकाळ, हर्षल चौधरी, जावेद तडवी, अक्षय शिरसाळे रोनक तडवी आदी अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने यावेळी उपस्थित होते.

 

Protected Content