Home प्रशासन वादळी पावसाने हजारो हेक्टरवरील केळी भुईसपाट; मदतीची मागणी

वादळी पावसाने हजारो हेक्टरवरील केळी भुईसपाट; मदतीची मागणी

0
9


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यात सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून हजारो हेक्टरवरील केळीच्या बागा अक्षरशः भुईसपाट झाल्या आहेत. हातातोंडाशी आलेले पीक काही क्षणांत उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. अनेक महिन्यांच्या परिश्रमाने जोपासलेली केळीची पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

 


Protected Content

Play sound