भुसावळ शहरात एनआरसी व सीएए विरोधात मूकमोर्चा (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 12 26 at 2.20.23 PM

भुसावळ, प्रतिनिधी | संविधान बचाव समितीतर्फे प्रांत कार्यालयपर्यत सीएए व एनआरसी कायद्याविरोधात सर्व धर्मीय मूकमोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजोरोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. एनआरसी व सीएए विरोधात जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा मूक मोर्चा असल्याचे बोलले जात आहे.

एनआरसी व सीएए विरोधात मूकमोर्चा खडका रोड येथील रझा टावर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, मोडन रोड, बाजारपेठ पोलीस स्टेशन ते प्रांत कार्यालयपर्यत काढण्यात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी हातात तिरंगा घेतला होता. या मूकमोर्चाची सांगता प्रांत कार्यालयात करण्यात आली. यानंतर मोर्चेकऱ्याच्या वतीने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना प्रांत रामसिंग सुलोने यांच्यामार्फेत निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, एनआरसी कायद्याने एससी, एसटी, ओबीसी व खासकरून मुस्लीम बांधवांना नुकसान पोहचविण्याची षडयंत्र  करण्यात आले असल्याचे म्हटले आहे. सीएए रद्द करा व एनआरसीचा बहिष्कार करा अशी मागणी करण्यात आली आहे. या मोर्चात हाजी सलीम सेठ चुडीवाले, कॉंग्रेसचे मुनव्वर खान, एमआयएमचे फिरोज रेहमान शेख, पीआरपीचे जगन सोनवणे, आरपीआयचे राजू सूर्यवंशी, साबीर शेख रौशन मेम्बर, दानिश पटेल, साजिद बागवान (बागवान बिरादी), नीलकंठ फालक,अशरफ कुरैशी, अँड. एहतेशाम मलिक, इम्रान खान इद्रीम खान, राजू तेलोरे, रमेश जैन, जुनेद खान अशरफ खान, शेख आबिद, प्रा. दिलिप सुरवाडे, योगेंद्रसिंह पाटील, युनुस माया, शे. वसिम शे. इब्राहिम, शेख आरिफ शे. गुलाम आदी सहभागी झाले होते.

Protected Content