यावल काँग्रेस समितीतर्फे यूपी सरकारचा निषेध

यावल प्रतिनिधी । उत्तरप्रदेश सरकारने राहूल व प्रियंका गांधी यांना दिलेल्या वागणुकीचा येथील काँग्रेस समितीतर्फे निषेध करण्यात आला.

देशातील बहुमताच्या जोरावर नरेन्द्र मोदी यांच्या केन्द्र शासनाने मंजुर केलेल्या शेतकरी व कामगार विरोधी कायदा तसेच उतरप्रदेशातील योगीच्या गुंडाराज शासना मध्ये महीलांवरील वाढत असलेल्या अत्याचार आणी हाथरस येथे अमानुष बलात्कारनंतर र्निदयीपणे अत्याचारनंतर मरण पावलेल्या मनिषा हिच्या कुटुंबास भेटण्यासाठी जात असलेल्या काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना योगीच्या गुंड पोलीसाकडुन झालेल्या धक्काबुकीच्या घटनेचा यावल तालुका काँग्रेस कमेटीने निषेध केला.

आज येथील यावल तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात संपन्न झालेल्या बैठकीत या प्रकाराचा तीव्र निषेध करण्यात आले. 

या बैठकीत सर्व प्रथम आमदार शिरीषदादा चौधरी, काँग्रेसचे जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे व कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून केंद्र व यूपीतील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी काँग्रेस समितीचे विविध विभागाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.