नांदेड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेत नेमके कसे लढायचे, याबाबतची भूमिका कार्यकर्त्यांनी निश्चित करायची आहे. कार्यकर्ते जो निर्णय घेतील, तो आम्ही वरिष्ठांना कळवू. मात्र, नांदेड शहर आणि जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकद मोठी आहे. जिथे भाजपला अधिक संधी आहे, त्या जागा कोणत्याही परिस्थितीत सोडल्या जाऊ नये, अशी माझी वैयक्तिक भूमिका असल्याचे स्पष्ट करीत माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी आगामी काळात नांदेडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत भाजपा स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत.

अशोक चव्हाण म्हणाले, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेत नेमके असे लढायचे, याबाबतची भूमिका कार्यकर्त्यांनी निश्चित करायची आहे. कार्यकर्ते जो निर्णय घेतील, तो आम्ही वरिष्ठांना कळवू. मात्र, नांदेड शहर आणि जिल्ह्यात भाजपची ताकद मोठी आहे. जिथे भाजपला अधिक संधी आहे, त्या जागा कोणत्याही परिस्थितीत सोडल्या जाऊ नये, अशी माझी वैयक्तिक भूमिका असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हंटले आहे. यावरून त्यांनी नांदेडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले असल्याचे स्पष्ट होत आहे.
“त्यामुळे सर्व पातळ्यांवर आपली तयारी सर्व मतदारसंघात आहेत. याचा अर्थ आपण त्यांच्या विरोधात लढतोय असं नाही. घटकपक्षांच्या विरोधात लढतोय असे नाही. युती आहे तर जागा सोडून द्याल, तर असे काही ठरलेले नाही. तुम्ही जर म्हणालात तर स्वबळावर आम्ही निवडणुका लढवू शकतो. हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. तुमचं मत आपण आपल्या वरिष्ठांना कळवू. आपल्याला जिथे पोषक वातावारण आहे, त्या जागा आपल्याला सोडायच्या नाहीत. त्या जागा अधिकाधिक प्रमाणावर लढायचे आहे. तुम्ही सांगा त्याप्रमाणे आपण निवडणुकीची तयारी करू”, असे अशोक चव्हाण म्हणाले.