भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी कोणाची होणार निवड

cricket teem

मुंबई प्रतिनिधी । कपिलदेव यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार समिती आज दि. 16 ऑगस्ट रोजी भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी आलेल्या सहा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखत घेणार आहे.

याबाबत माहिती अशी की, त्यात ऑस्ट्रेलियाचे टॉम मूडी, न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन, भारताचे २००७च्या टी-२० विश्वविजेत्या संघाचे व्यवस्थापक लालचंद राजपूत, माजी अष्टपैलू क्रिकेटपटू रॉबिन सिंग, वेस्ट इंडिजचे फिल सिमन्स व रवी शास्त्री यांचा समावेश आहे. शास्त्री यांची कामगिरी प्रभावी राहिलेल्यामुळे त्याचे पारडे जड आहे. तसेच गेल्या वर्षी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कसोटी मालिकाविजय मिळविला होता. शिवाय, शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली खेळतांना भारताने २१ कसोटीपैकी १३ कसोटीत विजय मिळविला आहे. टी-२० मध्ये तर भारताने ३६ पैकी २५ सामने जिंकले आहेत. ही टक्केवारी ६९.४४ इतकी आहे. वनडे क्रिकेटमध्ये भारताने शास्त्री यांच्या प्रशिक्षककाळात ६० पैकी ४३ सामने जिंकले आहेत. पण २०१५च्या वर्ल्डकपमध्ये तसेच यंदा झालेल्या वनडे वर्ल्डकपमध्येही भारताला उपांत्य फेरीच्या पुढे मजल मारता आली नाही. त्याचबरोबर सध्या सुरू असलेल्या विंडीज दौऱ्यातही टी-२० तसेच वनडे मालिकेत भारताने विजय मिळविला आहे.

Protected Content