केवळ 16 रुपयात होणार ‘डायलिसिस’

डायलिसिस

 

मुंबई प्रतिनिधी । येथे किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत असल्यामुळे महापालिकेने खाजगी संस्थांच्या मदतीने डायलिसिस केंद्र सुरू केले आहे. ही संस्था रुग्णांना फक्त १६ रुपयांत डायलिसिस करून देणार आहे.

याबाबत माहिती अशी की, भायखळा येथील झुला मैदान परिसरात मुक्ती फौज दवाखान्यात एका संस्थेला पालिकेने एक रुपया प्रतिचौरस मीटर या दराने ३५० चौरस मीटर जागा उपलब्ध करून दिली आहे. ही संस्था रुग्णांना फक्त १६ रुपयांत डायलिसिस करून देणार आहे. किडनी रुग्णांसाठी डायलिसिस ही अत्यावश्यक बाब असते. त्यामुळे पालिकेने मुंबईत अधिकाधिक डायलिसिस सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मुक्ती फौज दवाखान्यातील केंद्र हा त्याचाच एक भाग आहे. या केंद्रामध्ये २५ डायलिसिस मशिन ठेवण्यात येणार आहेत. हे केंद्र सकाळी 8 ते रात्री 8 अशा दोन शिफ्टमध्ये सुरू राहणार आहे. तर पहिल्या पाच वर्षांसाठी ही जागा एक रुपया प्रतिचौरस मीटर नाममात्र दराने ‘सहारा एज्युकेशनल अ‍ॅण्ड मेडिकल चॅरिटेबल ऑर्गनायझेशन’ या संस्थेला देण्यात येणार आहे. यासाठी संस्थेकडून सुरक्षा ठेव म्हणून साडेसात लाख रुपये घेण्यात येणार असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

Protected Content