वरणगाव प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे आज महिलांनी महिला शक्ती कायद्याचे फटाके फोडून व एकमेकींना पेढे भरवून आनंद व्यक्त करत कायद्याचे जल्लोषात स्वागत केले आहे.
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये नारी शक्ति हा कायदा लागू करण्यात आलेला आहे ,त्यामुळे भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील महिलांनी या कायद्याचे बस स्टॅन्ड चौकांमध्ये जोरदार स्वागत केले आहे, यावेळी फटाके फोडत व नारीशक्ती कायद्याचा विजय असो अशा घोषणा देत एकमेकींना पेढे भरवत आनंद व्यक्त केला आहे, यावेळी राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा उपाध्यक्ष प्रतिमा तावडे सामाजिक कार्यकर्त्या सरिता माळी यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1300308417100298