रिसॉर्ट प्रकरणी परब यांना कारणे दाखवा नोटीस

रत्नागिरी : राज्याचे परिवहन मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब  यांच्या दापोलीतील साई रिसॉर्टचं  बांधकाम तोडण्यासाठी भारत सरकारच्या पर्यावरण खात्यानं कारणे दाखवा नोटीस दिली आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दापोली मुरुड येथे कोविड काळात अनिल परब यांनीA नियमांचे उल्लंघन करुन रिसॉर्ट बांधले अशी तक्रार सबंधित कार्यालयात केली होती. मुरुड समुद्रकिनार्‍यावरील बांधलेले साई रिसॉर्ट हे अनधिकृतरित्या बांधले ते तोडण्यासंबंधीची नोटीस भारत सरकारद्वारे १७ डिसेंबर २०२१ रोजी पाठवण्यात आली आहे. या नोटीसमध्ये १५ दिवसांच्या आत कारणे दाखवा नोटीसचे उत्तर देण्याचे सांगण्यात आले आहे.

साई रिसॉर्ट एन एक्स हे दोन मजली अनधिकृत रिसॉर्ट आहे. सी कौंच बीच रिसॉर्ट हा तळ मजला + पहिला मजला आणि दुसर्‍या मजल्यावरील स्ट्रक्चर कव्हर करण्यात आले आहे. या रिसॉर्टमध्ये प्रवेश करण्यासाठी समुद्राच्या वाळूतून अनधिकृत रस्ता दिला गेला आहे. सीआरझेड नोटिफिकेशन २०११ च्या कलम ८ च्या अंतर्गत ही नोटीस देण्यात आली.

 

 

 

 

 

Protected Content