विलीनीकरण करण्यात अडचण काय ? : चंद्रकांत पाटील

मुंबई प्रतिनिधी | एस.टी. कर्मचार्‍यांच्या विलीनीकरणाला साफ नकार देणार्‍या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका करत यात काय अडचण आहे ? असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.

या संदर्भात वृत्त असे की, हिवाळी अधिवेशनात एसटीच्या विलीनीकरणाची मागणीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत महत्त्वाचे  वक्तव्य केले आहे. एसटी कामगाराचं शासनात विलिनीकरण शक्य नाही अशी स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडले. त्यावरुन आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विलनीकरण करण्यात अडचण काय आहे असा सवाल केला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, एसटी कर्मचार्‍यांचे विलनीकरण करण्यात अडचण काय आहे. राज्याची तिजोरी आहे कशासाठी हे मला कळतचं नाही. देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी खूप काटेकोरपणे राज्य चालवल्याने १५ कोटींच्या वर आपल्याला कर्ज घ्यावे लागणार नाही. कोविडमध्ये मोदींनी पाच टक्के आणखी वाढवून दिले आहेत. सभागृहामध्ये एसटीच्या कर्मचार्‍यांना पगारवाढ देता येत नाही असे सांगितले. मग त्या तिजोरीचे करायचे काय? नाही दे जा असं म्हणून चालत नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Protected Content