गोवंश तस्करांवर कारवाई करा : आ. शिरीष चौधरींची विधानसभेत मागणी

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र-मध्यप्रदेश सिमेवरुन मोठ्या प्रमाणात अवैध गुरांची वाहतूक सुरु आहे.या बाबत आमदार शिरीष चौधरी यांनी अधिवेशना तारांकीत प्रश्न उपस्थित कारवाईची मागणी केली आहे.

नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार शिरीष चौधरी यांनी रावेर विधानसभेतील विविध प्रश्न तारांकीत उपस्थित केले.यामध्ये जळगाव जिल्ह्यात प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या सुमारे ५ हजार ५५० महिला लाभार्थ्यांचे सुमारे २ कोटी ७५ लाख रुपये अनुदान प्राप्त झालेल झाले नाही याकडे त्यांनी लक्ष वेधून घेतले. यासोबत रावेर तालुक्यात १४ हजार जनावरांना लंम्पी या आजाराने १०९ जनावरांचा मृत्यू झाला या बाबत.यावल व रावेर तालुक्यात पशुसंवर्धन विभागातील व पशुवैद्यकीय दवाखान्यातील अनेक पदे रिक्त बाबत रावेर तालुक्यातील केळी पिक घेणार्‍या सुमारे ८०० शेतकर्‍यांचे विमा योजनेचे लाखो रुपये विमा कंपनीकडून मिळाला नसल्या बाबत राज्यातील १४९८५ शाळांवर टांगती तलवार असणे बाबत.त्यांनी मुद्दे उपस्थित केले.

दरम्यान, रावेर तालुक्यातील गायरान जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण केलेल्या अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढून घेण्या बाबत त्यांनी मुद्दा उपस्थित केला. तालुक्यातील तांदळवाडी येथील १०५ प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबे नवीन गावठाणात पुनर्वसन प्लॉट मिळण्याबाबत १२. रावेर (जिल्हा जळगाव) नगरपालिका हद्दीत सन २०२२-२३ ते २०२५-२६ ही चतुर्थ कर आकारणी हद्दीतील व हद्दी बाहेरील मालमत्तेची अवास्तव कर आकारणी केली जात असल्या बाबत आमदार शिरीष चौधरी यांनी प्रश्न उपस्थित करत कारवाईची मागणी केली आहे.

लक्षणीय बाब म्हणजे आमदार शिरीष चौधरी यांनी गोवंश तस्करांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी त्यांनी पाल मार्गे काही महिन्यांपूर्वी सुकी नदित फेकलेल्या २३ मृत गुरांचा संदर्भ देत यातील गौ तस्करांवर कठोर कारवाईची मागणी केली. परिसरातून मोठ्या प्रमाणात अवैध गोवंश तस्करी होत असल्याने त्यांनी याबाबत कारवाईची मागणी केली.

आमदार या प्रश्नाकडे लक्ष देतील का.?

रावेर पंचायत समितीच्या गोठा योजनेत अनियमता झाल्याची ओरड आहे. तत्कालीन वनक्षेत्रपाल आर जी राणे यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झाली परंतु कागदोपत्री झाल्याची माहिती आहे. पाल रावेर रस्तावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे.रावेर तालुक्यात जिल्हा परिषदने तयार केलेले काही साठवण बंधारे निकृष्ट झाल्याची ओरड आहे.या प्रश्नाकडे आमदार शिरीष चौधरी यांनी लक्ष देण्याची मागणी जनतेतुन होत आहे.

Protected Content