नेहरूनंतर वाजपेयी हेच सर्वाधीक लोकप्रिय पंतप्रधान !

मुंबई प्रतिनिधी | पंडित नेहरू यांच्या नंतर अटलबिहारी वाजपेयी हेच देशातील सर्वाधीक लोकप्रिय पंतप्रधान असल्याचे विधान शिवसेनेचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी केले आहे.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त देशभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमिवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या संदर्भात राऊत म्हणाले की, पंडित नेहरुंनंतर अटल बिहारी वाजपेयी हे सर्व राजकीय पक्षांचे ते लोकप्रिय नेते होते. ते आपल्या विचारधारेसोबत एकनिष्ठ होते. देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांचे कार्य आम्हाला जवळून पाहता आले. देशाचे नेतृत्व कसे असावे हा परिपाठ आम्हाला त्यांच्याकडून मिळाला.

हिंदुत्वाच्या विचारधारेसोबत कधीही तडजोड न करता हा देश सगळ्यांचा आणि देशातील एकात्मतेवर भर देऊन राजकारण करणारे अटलबिहारी वाजयेपयी होते. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन भाजपा आणि शिवसेनेच्या झालेल्या युतीला वाजपेयी यांचे फार मोठे योगदान होते. बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे नाते होते. पंतप्रधान असताना ते अनेक विषयांवरु बाळासाहेबांसोबत चर्चा करत होते. आज जो भारतीय जनता पक्ष दिसत आहे त्याचे स्तंभ आहेत अडणवाणी आणि वाजपेयी. वाजयपेयींचे स्मरण आम्हाला कायम होत असते, असे संजय राऊत म्हणाले.

Protected Content