निवृत्ती नगरात श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानतर्फे मोफत सार्वजनिक वाचनालय सुरूवात

जळगाव प्रतिनिधी । शहरातील निवृत्ती नगरात जनमत प्रतिष्ठान व मुक्ताई महिला बहुउद्देशीय संस्था व श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानच्या वतीने आज मंगळवार २९ डिसेंबर रोजी स्व. किसन पुणा नाले यांच्या स्मरणार्थ मोफत सार्वजनिक वाचनालय सुरू करण्यात आले.

याप्रसंगी साहस फाऊंडेशनच्या सरिता ललीत कोल्हे, कमल केशव प्रतिष्ठानच्या भारती म्हस्के, ॲड. अभिजीत रंधे, मुक्ताई महिला बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष व नगरसेविका नीता सोनवणे, प्राथमिक शिक्षण उपसंचालक शशिकांत हिंगोणेकर, श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक दाभाडे, आरोग्य दूत पप्पू जगताप, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, अखिल भारतीय शाहू ब्रिगेड महिला जिल्हाध्यक्ष हर्षाली पाटील, चित्रा मालपाणी, साहाय्यक फौजदार विश्वास पाटील, साळी समाजाचे अध्यक्ष अशोक साळी, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष साहिल पटेल, दिशा स्पर्धा परीक्षेचे संचालक वासुदेव पाटील, सुबोध क्लासेस सी. आर. पाटील, पोलीस सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अतुल बोंडे, विजय लुले, मानव सेवा शाळेचे कलाशिक्षक दाभाडे, अनंत नेवे, सचिन सैंदाणे, सुबोध क्लासचे संचालक आर.सी. पाटील, जयेश चौधरी, प्रशांत सुर्वे, अशोक म्हस्के यांची उपस्थिती लाभली.

Protected Content